Ladki Bahin Yojana News SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : कारवाल्या 'लाडक्या बहिणीं'ची होणार चौकशी, आजपासून घरोघरी जाणार अंगणवाडी सेविका | Video

Ladki Bahin Yojana Disqualification News : लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे.

Saam Tv

ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी आहे, त्यांना आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहे. त्यानंतर अपात्र महिलांना योजनेतून बाद केलं जाणार आहे.

पुणे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांची आम्ही आजपासून अंमलबजावणी करत आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी घेऊन त्यानुसार पडताळणीचे प्रामाणिकपणे काम बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत. चारचाकी वाहने असलेल्यांची नावे शासनाला कळविण्यात येतील. पुण्यात २१ लाख ११ हजार ९९१ बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले होते. यापैकी चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.

काय आहेत निकष ?

- लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ च्या दरम्यान असावे.

- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे.

- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.

- संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

- चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT