Ladki Bahin Yojana SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : दिल्लीच्या लाडक्या बहीणी सत्तेची चावी केजरीवाल यांच्या हातात देणार? आपची नवीन योजना |VIDEO

Delhi News: महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात विजयश्री खेचून आणण्यास महत्वाची भूमिका बजावणारी लाडकी बहीण योजना आता दिल्लीत राबवली जात आहे. या योजनेचा 'आप'ला निवडणुकीत किती फायदा होईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Saam Tv

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता येण्यात मोठा वाटा होता. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लाभार्थी महिलांना दर महिन्याला १ हजार रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. तसंच हे मानधन २१०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. आता या घोषणेनंतर दिल्लीच्या लाडक्या बहीणी सत्तेच्या चव्या 'आप'कडे सोपवतील का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे भाजप आणि महायुतीला महाराष्ट्र तसंच मध्यप्रदेशच्या निवडणुकीत यश मिळालं होतं. तसंच आता आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करू बघत आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती, की दिल्लीत त्यांचं सरकार आलं तर तेथे देखील लाडकी बहीण योजना लागू केली जाईल. या योजनेचे फॉर्म भरण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. यात लाभार्थी महिलांना सध्या १ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकांत लाडक्या बहिणींची जादू दिसेल का? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT