Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.या योजनेचा फायदा घेणाऱ्या बहिणींची नावं आता गायब होणार असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे या मेसेजमध्ये तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब होणार का...? हा प्रश्न तुम्हाला व्हायरल झालेला मेसेज पाहिल्यानंतर नक्कीच पडेल...कारण, गेल्या काही दिवसांपासून आता लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचं नाव कमी होणार असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...व्हायरल होत असलेला मेसेज काय आहे ते आधी पाहुयात..

नवीन मुख्यमंत्र्यांच्या हाती राज्याचा कारभार येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची कडक पडताळणी होईल.निकष पडताळल्यानंतरच पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार. हा मेसेज व्हायरल होत असून, यासोबत काही निकष देण्यात आलेयत. व्हायरल मेसेजमध्ये काय निकष सांगण्यात आलेयत ते पाहुयात

लाडक्या बहिणींना निकषांचा अडसर?

योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलेचा पती टॅक्स भरतो का?

लाभार्थी लाडकीच्या कुटुंबाकडे चारचाकी कार आहे का?

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?

परित्यक्ता, विधवा, निराधार दोन-दोन योजनेचा लाभ घेतात का?

या सर्व निकषांची पडताळणी होणार असून, यामुळे अनेक महिलांचं नाव गायब होणार असल्याचा दावा केलाय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...खरंच लाडक्या बहिणींची नावं गायब होणार हा निर्णय झालाय का...? याबाबत अधिकाऱ्यांशीही चर्चा केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

SCROLL FOR NEXT