kumbharli Ghat Ratnagiri Chiplun saam tv
Video

बापरे! कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली | VIDEO

Ratnagiri Kumbharli Ghat: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटातील संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळं रस्ता खचून वाहतुकीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आहे.

Nandkumar Joshi

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण - कराड मार्गावरील कुंभार्ली घाटातील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे.

या मार्गावरील रस्ता खचला तर, घाटातील वाहतूक बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खोल दरीच्या जवळील भागातच रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली आहे. तसेच रेलिंग देखील तुटली आहे. तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी म्हणून घटनास्थळी दगड लावण्यात आले आहेत. मात्र, यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याच घाटरस्त्यातून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT