Krishnaraaj Mahadik -rinku Rajguru Social Post saam tv
Video

कृष्णराज महाडिकांनी सांगितलं रिंकू राजगुरूच्या भेटीमागचं सीक्रेट! VIDEO

Krishnaraaj Mahadik -Rinku Rajguru : रिंकू राजगुरूसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्वतः कृष्णराज महाडिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Nandkumar Joshi

पहिल्यांदाच टीव्हीच्या पडद्यावर चेहरा बघून अवघी तरुणाई 'सैराट' झाली होती, त्या आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिचा कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर 'आर्चीला परशा' मिळाला अशी चर्चा रंगू लागली. महाडिकांच्या फॅन्सनं त्यांच्या पोस्टवरही तशाच आशयाच्या कमेंट केल्या होत्या. यानंतर आता स्वतः कृष्णराज महाडिक यांनी साम टीव्हीला एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली.

रिंकू राजगुरू हिच्यासोबतच्या भेटीचं सीक्रेट कृष्णराज यांनी सांगितलं. आम्ही ठरवूनच भेटलो होतो. मंदिरात दर्शनासाठीही एकत्रच गेलो होतो. पण त्याचा अर्थ वेगळा काढला जात आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. त्यापलीकडे आमच्यात काहीच नाही. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही असं काहीही समजू नका, असं कृष्णराज यांनी सांगितलं.

अलीकडेच कृष्णराजचा एक व्लॉग व्हायरल झाला होता. त्यात त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. त्यावरही कृष्णराजनं स्पष्टीकरण दिलं आहे. घरात दोन मोठे भाऊ आहेत, लग्ने झाली आहेत. सहाजिकच आता माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. आमची फॅमिली मजा-मस्ती करणारी आहे. जेव्हा एकत्र आलो तेव्हा साहेब असं बोलतील असं अपेक्षित नव्हतं. पण ते बोलून गेले आणि खूप मोठा विषय झाला. माझं लग्न कधी होईल हे सुद्धा माहीत नाही, असं कृष्णराज म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT