Navi Mumbai SAAM TV
Video

Navi Mumbai Voter List Scam : नवी मुंबईत मतदार यादीत महाघोटाळा, एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांची नाव | VIDEO

Voter List Error Koparkhairane : निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत केलेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शौचालयात , आयुक्त निवासात मतदान नोंदणी भेटल्यानंतर आता चक्क एकाच मोबाईल नंबरवर २८८ मतदारांची नोंदणी सापडली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, कोपरखैरणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात एकाच मोबाईल नंबरवर तब्बल २८८ मतदारांची नोंदणी झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, हा मोबाईल नंबर एका शासकीय अधिकाऱ्याचा, म्हणजेच तलाठ्याचा आहे. चंद्रकांत डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 'एकाच मोबाईल नंबरवर दोनशे अठ्यायशी लोकांची नावं ही अॅड केलेली आहे'. यादीतील अनेक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचेही तपासात समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assam CM : आसामच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचा मोठा निर्णय, शपथविधी सोहळा कधी आणि किती वाजता?

Maharashtra News Live Update: विकास लवांडे यांना अटक करा, वारकरी सांप्रदायाकडून वाघोली पोलीस ठाण्यात आंदोलन

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

SCROLL FOR NEXT