Panchganga River saam tv
Video

Weather Update: पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर; नदीकाठच्या गावांना पूराचा इशारा|VIDEO

Kolhapur News: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मान्सूनपूर्व पावसामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वेगाने वाढत असून यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर: संपूर्ण राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अनेक शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, गुरुवारी दुपारी सुमारे अडीच वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने तत्काळ दोन्ही बाजूंनी बंधाऱ्यावरची वाहतूक बंद केली आहे.

दरम्यान, शहर व परिसरात पावसाचा जोर कायम असून नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Om chanting benefits: दररोज 21 दिवस ‘ॐ’चा जप केल्याने काय बदल घडतात?

भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

SCROLL FOR NEXT