Rada In Golul Meeting Saam Tv
Video

Gokul Meeting: गोंधळ, हुर्रेबाजीत 'गोकुळ'च्या वार्षिक सभेत राडा, मोठा पोलीस बंदोबस्त; पाहा VIDEO

Rada In Golul Meeting: गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी येताच कार्यकर्ते आणि सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या सभास्थळी सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

Priya More

कोल्हापुरतील गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते आणि सभासदांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी येताच कार्यकर्ते आणि सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या सभास्थळी सध्या गोंधळाचे वातावरण आहे. सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेमध्ये पुन्हा आरोप -प्रत्यारोपांच्या फेरी उडण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या प्रांगणात आजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. सत्ताधारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध विरोधक म्हणून महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

गोकुळमधील सभासदांनी ठेवलेल्या ठेवी या सत्ताधाऱ्यांनी मोडून काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सभेमध्ये आता संचालक मंडळ सभासदांना नेमकं काय उत्तर देतात याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

SCROLL FOR NEXT