Kolhapur Panchganga River Water Rise Saam TV
Video

Panchganga River Water : पंचगंगा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ, तब्बल ५२ बंधारे पाण्याखाली, धडकी भरवणारा VIDEO

Kolhapur Panchganga River Water Rise : प्राप्त माहितीनुसार, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर पोहचली आहे. कोल्हापुरातील तब्बल ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Satish Daud

रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला देखील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर पोहचली आहे. कोल्हापुरातील तब्बल ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोक्याची पाणीपातळी ४२ फूट इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस सुरू असला, तर कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेरून वाहू लागलेली आहे. तर नदीपात्राशेजारी असणाऱ्या शेतीमध्ये देखील नदीचे पाणी घुसलेल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT