Krishna River saam tv
Video

Weather Update: कोल्हापूरातील शिरोळमध्ये पावसाचा धुमाकूळ; कृष्णा नदीची पातळी वाढली, बंधारा ओव्हरफ्लो|VIDEO

Kolhapur News: शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी १६ फूट ३ इंचांवर पोहोचली असून, त्यामुळे बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर: राज्यभरात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले असून कोल्हापूरमध्ये देखील पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी १६ फूट ३ इंचांवर पोहोचल्याने बंधारा ओव्हरफ्लो झाला.

बंधाऱ्यावरून सुमारे ६ इंच पाणी वाहू लागले असून, सध्या ३ हजार क्यूसेक वेगाने कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे. यावर्षी कोयना वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आल्याने प्रशासनाने सुरुवातीलाच बंधाऱ्याचे सर्व बरगे बसवून पाण्याची पातळी १४ फुटांवर स्थिर ठेवली होती. मात्र, मागील चार दिवसांपासून शिरोळ तालुक्यात जोरदार वळवाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी घटली आणि नदीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. परिणामी, बंधाऱ्याची पाणीपातळी वाढून तो ओव्हरफ्लो झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT