जुना मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीतील शिळफाटा बाजारपेठ परिसरात विचित्र अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या खासगी बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
चालकाचा खासगी बसवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या बसनं बाजारपेठेत असलेल्या अनेक दुचाकी, कार, जीप, रिक्षांना जोरदार धडक दिली. अर्धा किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. शिळफाटा, बाजारपेठ परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. काही वेळात पोलीस पोहोचले. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.