Kharghar Saam TV
Video

Kharghar : खारघर २४ तासांपासून अंधारात! केबल आगीत १२६ ट्रान्सफार्मर बंद | VIDEO

Major Power Outage in Kharghar : खारघर अधिराज फिडरला लागलेल्या आगीत केबल जळाल्यामुळे खारघर २४ तासांपासून अंधारात आहे. अजूनही महावितरणकडून वीज कधी येणार यासंदर्भात माहिती आलेले नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या २४ तासांपासून खारघर परिसर अंधारात असून, नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भिंगारी उपविभागातील ३३ केव्ही अधिराज फिडरला आग लागून केबल्स जळल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटने नंतर तब्बल १२६ ट्रान्सफार्मर आणि २ उपकेंद्रे बंद पडली आहेत. विशेषतः खारघरमधील टाटा-१ आणि टाटा-२ या भागांतील १२ ट्रान्सफार्मर बंद असल्याने हजारो घरांमध्ये वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

महावितरणाकडून अद्यापही विजपुरवठा कधी पूर्ववत होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. विजेअभावी पाणिपुरवठा, मोबाईल चार्जिंग, इंटरनेट आणि दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाकडून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

RCB vs GT IPL 2026 Final: अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स 'टाय टाय फिस'; गिल-सुदर्शन-बटलर फ्लॉप

रत्नागिरीतील शिवरायांचा किल्ला विकला? किल्ला शासनाचा की खासगी मालकीचा?

SCROLL FOR NEXT