Helicopter Crash Video 
Video

Helicopter Crash Video : लँडिंग करताना हेलिकॉप्टर गरागरा फिरलं अन् धाडकन कोसळलं; थरार पाहा

Kedarnath Helicopter Crash Video : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे लँडिंग करताना हेलिकॉप्टर कोसळलं. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

Satish Daud

उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे लँडिंग करताना हेलिकॉप्टर कोसळलं. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. हेलिकॉप्टरमध्ये किती व्यक्ती होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये उतरताना भारतीय लष्कराच्या एका हेलिकॉप्टरचे नुकसान झाले होते. या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्यासाठी लष्कराने दुसरे एक हेलिकॉप्टर आले. नादुरुस्त असलेल्या हेलिकॉप्टरला घेऊन सदरील हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण भरले. मात्र, त्याचवेळी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने पुन्हा लँडिंगचा निर्णय घेतला.

मात्र, लँडिंग करण्याआधीच हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटली. त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर आकाशात गरागरा फिरले आणि धाडकन जमिनीवर कोसळले. या अपघातात कोणी जखमी झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT