Residents of illegal buildings in Kalyan-Dombivli gather after receiving eviction notices from KDMC. saam tv
Video

MahaRERA Scam: कल्याण-डोंबिवलीतील हजारो नागरिक होणार बेघर, 55 इमारतींना KDMC कडून नोटिसा|VIDEO

Kalyan-Dombivli Municipal Corporation: कल्याण-डोंबिवली महापालिकेने महारेरा घोटाळ्यातील 55 अनधिकृत इमारतींना नोटीस बजावली असून तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत.

Omkar Sonawane

कल्याण-डोंबिवली महापालिकेने (KDMC) महा⁠रेरा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत 65 अनधिकृत इमारतींमधील 55 इमारतींना नोटीस बजावल्या आहेत. या इमारतींना महापालिकेने तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी आदेशाचे पालन न केल्यास पोलिस बळाचा वापर केला जाईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

या घोटाळ्यातील अनेक इमारती महारेराच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात राहणाऱ्या नागरिकांवर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या नोटीसनंतर रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

या कारवाईमुळे हजारो कुटुंबे उघड्यावर येण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी सरकारकडे आणि महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT