Karuna Sharma SaamTv
Video

Karuna Sharma : येरवडा आणि बीड जेलमधील भयानक अनुभव सांगताना करूणा शर्मा रडल्या | Video

Dhananjay Munde News : वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मुंडे यांच्याकडून झालेल्या त्रासाचा पाढा वाचला आहे. यावेळी बोलताना करुणा शर्मा भावून होत रडल्या.

Saam Tv

वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या तक्रारीत धनंजय मुंडे यांना देखभालीसाठी महिन्याला दोन लाख रूपये देण्याचा आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मुंडे यांच्याकडून झालेल्या त्रासाचा पाढाच वाचला. यावेळी बोलताना करुणा शर्मा भावून होत रडल्या.

करुणा शर्मा म्हणाल्या की, "माझ्याकडे आणि माझ्या परिवाराकडे काहीच पैसे नाही. परंतु त्यांच्या (मंत्री मुंडे) नोकरांकडे चार-चार हजार कोटी रुपयांची मालमत्ता निघत आहे. माझ्या घरावरील कर्जाचे हप्ते गेल्या सात महिन्यांपासून थकले आहेत. माझ्या बहिणीसोबत शारीरिक हिंसाचार झाला. माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकले गेले. 45 दिवस येवरडा तुरुंगात राहिली आहे. कोणी आले नाही मला भेटायला. फक्त आभाळ बघायचे. कोण मला तुरुंगात काढणार? अॅट्रोसिटीसारख्या केसमध्ये मला तुरुंगात ठेवले गेले. बीडसारख्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवले". येरवडा आणि बीडमधील तुरुंगातील दिवस, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील केबिनमध्ये वाल्मिक कराडकडून झालेली मारहाण, या सर्व प्रकाराबाबत करुणा शर्मा यांना बोलताना अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT