Lingayat Samaj Saam TV
Video

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Karnataka : कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणावरून संदर्भात मोठा वाद पेटला आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणावरून मोठा वाद पेटलाय. राज्यातील प्रभावी लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं आपल्या सदस्यांना सर्वेक्षणात स्वतःची नोंद ‘हिंदू’ म्हणून नव्हे तर ‘वीरशैव-लिंगायत’ म्हणून करण्याचं आवाहन केलंय. या पत्रकामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरू होणार असून त्याआधीच वीरशैव-लिंगायत महासभेनं समाजातील सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्यात.

लिंगायत समाज हा राज्यात प्रभावी मानला जातो आणि राजकीय समीकरणांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या निर्णयामुळे भाजपच्या हिंदू मतदारसंघावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका सुरू केली असून येत्या काही दिवसांत कर्नाटकातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खानविरोधात दुसरा गुन्हा दाखल

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार, पीडिता ५ महिन्यांची गरोदर

Bigg Boss Marathi : ८ वर्षांनी बिग बॉस मराठीत घडला इतिहास, तन्वी कोलतेची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

Jio Cheapest Recharge: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

SCROLL FOR NEXT