Kalyan Mock Drill saam tv
Video

Mock Drill: कल्याणमध्ये वाजला युद्धाचा सायरन, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Kalyan News: भारत आणि पाकिस्तान तणाव वाढत असताना युद्धाची स्थिति निर्माण झाल्यावर नागरिकांनी काय उपाययोजना करावी या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये मॉक ड्रिल पार पडले.

Omkar Sonawane

युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी आपले संरक्षण कसे करावे व कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये मॉकड्रिल्सचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर मॉकड्रिल आयोजित करण्यात आले.

या मॉकड्रिलमध्ये सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड, अग्निशमन विभाग, कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) अधिकारी तसेच TDRF च्या पथकांनी सहभाग घेतला होता. दुपारी चार वाजता सायरन वाजवून मॉकड्रिलची सुरुवात करण्यात आली.

सायरननंतर स्फोट घडल्याचे दर्शवणारे कृत्रिम दृश्य सादर करण्यात आले, त्यानंतर आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ही सगळी कारवाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळवा ₹८२०००; कॅल्क्युलेशन वाचा

Crime News : आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Ashok Mama : 'बिग बॉस मराठी' सुरू होण्याआधीच अशोक मामांची एक्झिट; मालिकेचा शेवट कसा होणार? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT