Kalyan Firing  Saam tv
Video

Kalyan Firing : कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला लागली गोळी; मुलगाही झाला जखमी, नेमकं काय घडलं? VIDEO

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण : कल्याण शहरातील नामांकित बिल्डर मंगेश गायकर याला गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा मुलगा शामल देखील जखमी झाला आहे. कल्याणमधील चिकणघर परिसरातील कार्यलयात ही घटना घडली.

बिल्डर मंगेश गायकर यांच्यासह त्याच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. लायसन्स वेपन साफ करत असतानाही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच सीसीटीव्ही तपासल्यानंतर नेमकी काय घटना घडली हे स्पष्ट होणार असल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले.

आज गुरुवारी दुपारच्या सुमारास बिल्डर गायकर त्यांच्या कल्याण चिकणघर येथील कार्यालयात होते. गायकर त्यांच्याजवळील लायसन्स वेपन साफ करत असताना गोळी सुटल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. यावेळी गोळी काचेवर लागल्याने काच फुटून गायकर यांच्या मुलगा श्यामल याच्या पायाला दुखापत झाली. गायकर आणि त्यांच्या मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यानी घटनास्थळास भेट दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन बिल्डर गायकर यांच्यास त्यांच्या मुलाची भेट घेतली.

भेटीनंतर उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर उपचार सुरु आहेत. कल्याणची ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात येतील. चौकशीनंतर नेमका काय प्रकार घडला आहे ? हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेसाठी वंचितची रणनीती; प्रकाश आंबेडकरांच्या खेळीनं मविआत चलबिचल ?

Crime News: उधारीचे पैसै मागताच राग अनावर; उकळता चहाचा टोप मारला चेहऱ्यावर

Health Tips: रोज प्या कढीपत्त्याचा चहा, सर्व आजार जातील पळून

Mumbai Rain : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया; अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT