KDMC Mayor Election saam tv
Video

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

kalyan Dombivli Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण होणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता आहे. सध्या तीन नावं आघाडीवर आहेत. शिंदे गटाचे दोन नवनिर्वाचित नगरसेवक आणि मनसेच्या नगरसेविकाही या शर्यतीत आहेत.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली | साम टीव्ही

कल्याण-डोंबिवलीचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं आहे. त्यामुळं राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदासाठी ३ नावांची चर्चा असून, ते प्रबळ दावेदार म्हणून मानले जातात. यात शिंदे गटाच्या हर्षाली थविल, मनसेच्या शीतल मंढारी आणि शिंदे गटाचे नगरसेवक किरण भांगले हे तीन नवनिर्वाचित नगरसेवक अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यामुळं त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. शिंदेसेनेनं कल्याण-डोंबिवलीत खबरदारी घेतली आहे. महापौरपदाचे दावेदार असलेले नवनिर्वाचित नगरसेवक कल्याण येथून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. वरिष्ठांकडून फोन आल्याने शिंदे गटाच्या हर्षाली थविल आणि किरण भांगले हे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुतोंडी कृती, एमआयएमसोबत युती? भाजपचा एमआयएमसोबत घरोबा?

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT