Jitendra Awhad Saam tv
Video

NCP MLA : राष्ट्रवादीचे आमदाराला थेट जीवे मारण्याची धमकी; फोनवर शिवीगाळ केली अन्...

Jitendra Awhad Marathi News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Namdeo Kumbhar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने थेट फोन करून आव्हाडांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, तसेच एक व्यक्ती त्यांच्या घराबाहेर उभी असल्याची माहिती दिली. या प्रकारची गंभीर दखल घेत खुद्द आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (Ex) वर पोस्ट करत या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

आमदार आव्हाड यांना अशा स्वरूपाच्या धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांच्या घराजवळ बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेल द्वारे देण्यात आली होती. वारंवार अशा प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT