Jitendra Awhad SaamTv
Video

Jitendra Awhad : तटकरेंकडून पवारांच्या खासदारांना संपर्क, आव्हाड आणि रोहित पवारांचा गंभीर आरोप, पाहा Video

Rohit Pawar And Jitendra Awhad News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता शरद पवार यांच्या खासदारांना संपर्क करत असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केला आहे.

Saam Tv

राज्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंपची तयारी सुरू आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता शरद पवार यांच्या खासदारांना संपर्क करायला सुरुवात केली असल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिवाय रोहित पवार यांनी देखील या संदर्भात विधान केलं आहे. दिल्लीमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत संपर्क साधला असल्याचा दावा या दोघांनीही केला असल्याचं बघायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, सुनील तटकरे यांनी फोन केलेले नाही. दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनात त्यांनी आमच्या खासदारांना भेटून बाप-लेकीला सोडून द्या, आणि आमच्याकडे येऊन जा अशी ऑफर दिली आहे. आमचा पक्ष घेतला, निशाणी घेतली आता खासदारपण पळवायच्या तयारीत आहे. लोकांच्या मनात काय आहे तेच कळत नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.

तर अंदर रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. दिल्लीत अधिवेशन सुरू होतं तेव्हा आमच्या खासदारांना अशा प्रकारे संपर्क सुनील तटकरे यांनी केला होता, हे माझ्याही कानावर आलेलं आहे. मात्र त्यांनी कितीही संपर्क केला तरी त्याबद्दल यांचे खासदार आणि आमदार काहीही वेगळा निर्णय घेणार नाही. आम्ही सगळे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT