Jayashree Thorat SaamTv
Video

Jayashree Thorat : जयश्री थोरात यांची आक्रमक भूमिका; पोलिसांनाच दिलं आव्हान | Marathi News

Sangamner News Upadate : जयश्री थोरात या पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्याच प्रकरण पुनः एकदा पेटलेलं दिसत आहे.

Saam Tv

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात या पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अहमदनगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसने जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या घटनेवरून सध्या थोरात आणि विखे-पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जयश्री थोरात पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी पुन्हा संगमनेर पोलिस ठाण्यावर शेकडो महिला कार्यकर्त्यांसह धाव घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आणि समर्थकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घ्या आणि वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करा, असं निवेदन दिलं. 'मला अटक करा. पण बाकीच्यांना त्रास देऊ नका.', अशी मागणी देखील त्यांनी केली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

SCROLL FOR NEXT