Dream Recorder Saam Tv
Video

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

Special Report: तुम्ही रात्री रोमांचक स्वप्न पाहत असाल. पण ते स्वप्न आता रेकॉर्ड करून पाहता येणार आहे. मात्र हे कसं शक्य होणार आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

तुम्ही झोपेत स्वप्न पाहता आणि सकाळी उठून पाहिलं तर स्वप्नच आठवत नाही, असं तुमच्यासोबत अनेकदा घडलं असेल. मात्र तुमचं स्वप्न तुम्हाला रेकॉर्ड करून फिल्मसारखं पाहता आलं तर कसं वाटेल? आश्चर्य वाटतंय ना... मात्र हे सत्य आहे. तुमचं स्वप्न आता तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पुन्हा पाहता येणार आहे... कारण जपानी शास्त्रज्ञांनी संशोधन करून एक स्वप्न रेकॉर्ड करणाऱ्या डिव्हाईसचा शोध लावल्याचा दावा करण्यात आलाय.. ज्यामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न प्लेबॅक करून पाहू शकता. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

कसं आहे स्वप्न रेकॉर्ड करणारं तंत्रज्ञान?

  • अॅडव्हान्स न्यूरल इमेजिंग टेक्नॉलॉजीचा वापर.

  • स्वप्न रेकॉर्ड करण्यासाठी मेंदूच्या अॅक्टिव्हीटी रेकॉर्ड करणार.

  • झोपेत रॅपिड आय मुव्हमेंट असल्याने स्वप्न स्पष्ट दिसतात.

  • AI च्या माध्यमातून मेंदूच्या तरंगाचा पॅटर्न दृश्यांमध्ये परिवर्तित करण्यात येणार.

  • हे रेकॉर्ड केलेलं स्वप्न प्लेबॅक करून पाहता येणार.

स्वप्न रेकॉर्ड करणाऱ्या मशीनमुळे फक्त स्वप्न प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद घेता येणार नाही तर मानसिक आरोग्य आणि भावनात्मक आव्हानांचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे आता तुमची स्वप्न तुम्हाला आता उघड्या डोळ्यांनी पुन्हा पाहता येणार आहेत....त्यामुळे जगभरात या अनोख्या तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Ulhasnagar Rada : उल्हासनगरमध्ये मोठा राडा! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याच्या कारवर दगडफेक, उमेदवाराची मुलगीही उपस्थित

Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

Maharashtra Election: नाद करा पण आमचा कुठं? शरद पवारांच्या इशाऱ्याला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

Weather Update: राज्यात थंडीला सुरुवात, आजपासून गारठा वाढणार

SCROLL FOR NEXT