Manoj Jarange Patil Vs Laxman Hake Saam TV
Video

Maratha Reservation : मनोज जरांगे यांची ईडी चौकशी करा, खोक्यांचा व्यवहार झालाय; कुणी केली मागणी? पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Vs Laxman Hake : केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी जरांगे यांची ईडी चौकशी करावी, अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

Satish Daud

मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलने करून दहशत माजवण्याचं काम करीत आहेत. तसेच ते ओबीसी बांधवांवर दबाव टाकत आहेत. सरकारमधील मंत्री त्यांना रात्री भेटायला येतात आणि बंद दाराआड चर्चा होते. 100 खोक्यांचा अपहार झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी जरांगे यांची ईडी चौकशी करावी, अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. ते जालना येथील जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी असा आरक्षणाचा वाद रंगला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी देखील वडीगोद्री येथे उपोषण सुरु केले आहे.

त्यामुळे संपूर्ण जालना जिल्ह्याचं वातावरण तापलं आहे. अशातच नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत ईडी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे मराठा बांधव आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

VIDEO : ... तर आदित्यला बर्फाच्या लादीवर झोपवून मारा, रामदास कदमांचा पलटवार

Suryakumar Yadav: मानलं भावा तुला...खाली पडलेली इंडियाची कॅप पाहून सूर्याने असं काही केलं;Video पाहून कौतुकच कराल

Maharashtra News Live Updates: अश्लील हातवारे केल्याच्या आरोपावर पाशा पटेल यांची प्रतिक्रिया

Sri Lanka Government : श्रीलंकेत डाव्यांचे सरकार, अनुरा कुमार दिसानायकेने मारली बाजी, भारतासाठी किती चिंतेची बाब?

SCROLL FOR NEXT