अमेरिकेत इस्रायली दूतावासातील दोघांची हत्या saam tv
Video

इस्रायलच्या दूतावासातील २ अधिकाऱ्यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, VIDEO

Israeli Embassy killing Case : अमेरिकेत इस्रायली दूतावासात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरानं त्यांच्यावर बेधुंद गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी) धक्कादायक घटना घडली. अमेरिकेतील इस्रायली दूतावासामधील दोन अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. दोघेही अधिकारी कॅपिटल यहूदी म्युझियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. म्युझियममधून बाहेर आल्यानंतर हल्लेखोरानं त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. दोन्ही अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यानं पॅलेस्टाइनला स्वतंत्र करा अशी घोषणा दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचण्याआधीच दोन्ही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा निषेध त्यांनी नोंदवला आहे. द्वेष आणि कट्टरपंथींना अमेरिकेत थारा नाही. पीडितांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त करतोय. अशा घटना खूप वेदनादायी आहेत, असंही ट्रम्प यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT