Israel Attacks On Iran Saam Tv
Video

Israel vs Iran War: इराण-इस्राइल युद्ध पेटलं, जॉर्डनमधील भारतीयांना देश सोडण्याच्या सूचना

Israel Attacks On Iran: इस्राइलने इराणवर हवाई हल्ला केला. इराणच्या ३० ठिकाणावर हल्ला करण्यात आला. दोन्ही देशांमधील युद्ध भडकले आहे. अशातच जॉर्डनमधील भारतीयांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Priya More

इस्राइल आणि इराणमधील युद्ध चांगलेच पेटलं आहे. इस्त्रायल आणि इराणमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. इस्राइलने इराणच्या ३० ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अनेक इमारती पडल्या. इस्राइलच्या संरक्षणमंत्र्यांनी या हल्ल्यांला दुजोरा दिला आहे. इराणने देखील इस्राइलला जशाच तसे उत्तर दिले आहे. इराण-इस्राइलमधील युद्धादरम्यान जॉर्डनमधील भारतीयांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाकडून जॉर्डनमधील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्राइल- इराण युद्धादरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी राहा, घरातून बाहेर पडून नका, असे आवाहन केले जात आहे. आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली आहे. इस्रायलमधील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT