Mumbai  
Video

युद्धाचा मुंबईला मोठा फटका; गॅस तुटवड्यामुळे २०% हॉटेल्स बंद, आकडा ५० टक्क्यांवर जाण्याची भीती

Mumbai gas shortage, Iran Israel war impact : इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता मुंबईतही दिसू लागला आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील सुमारे २०% हॉटेल्स बंद झाली असून पुढील काही दिवसांत हा आकडा ५०% पर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel war impact on Mumbai hotel industry : इराण-इस्रायल युद्धाचा फटका आता थेट मुंबईला बसत असल्याचे दिसत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स सध्या बंद झाली आहेत. तर आगामी 3 दिवसात ही संख्या 50 टक्क्यांवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. आगामी काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर मुंबईतील हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील हॉटेल उद्योगावर झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (LPG) तीव्र तुटवड्यामुळे मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. पुढील ३ दिवसात ५० टक्के हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे.

आखाती देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. बेंगळुरूमध्येही पुरवठा कमी झालाय, आता याचा परिणाम मुंबईत जाणवू लागला आहे तुटवडा असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता 'इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन'ने (AHAR) व्यक्त केली आहे 'आहार'चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल इंडस्ट्रीसमोर मोठे संकट ओढवू शकते [01:50].

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT