Iran-Israel War Saam Tv
Video

Iran-Israel War: इराणनं अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडलं, हवेतच आगीचा गोळा बनलं अन्...; पाहा VIDEO

Iran Shoot Down US F 15 Fighter Jet: इराणने अमेरिकेचे F-15 हे फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

मध्यपूर्वेतील युद्धात इराणने अमेरिकेला जबरदस्त धक्का दिलाय. इराणच्या संरक्षण दलानं कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे अत्याधुनिक 'F-15' फायटर जेट पाडल्याचा दावा केलाय. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकन हवाई दलाचे हे फायटर जेट इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झाले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

इस्राइल आणि अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराण आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी इराणने एक नवीन दावा केला आहे. इराणने सांगितले की, त्यांनी कुवेतवरून उड्डाण करणारे एक एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. इराणने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये फायटर जेट हवेत आगीचा गोळा होत खाली पडताना दिसत आहे. हे जेट अमेरिकेचे असल्याचा दावा इराणने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT