एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. .सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची गावाला जाण्याच्या मोठी गर्दी आहे. एसटी बंद असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने सध्या गावाला जात आहेत. एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन, चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतो. तरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे! प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान आज संध्याकाळी 7 वा. सह्याद्रीवर मुख्यमंत्री बैठक घेणारेत यासाठी 27 ST कर्मचारी संघटनांना निमंत्रण देण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.