IndiGo flight Saam TV
Video

Flight Emergency Landing : दिल्लीहून गोवा कडे जाणाऱ्या विमानाचं इंजिन बंद, मुंबईत आपत्कालीन लँडिंग | VIDEO

Delhi To Goa Flight : दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या इंडिगो फ्लाईट 6E 231 या विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणानंतर काही वेळातच बिघाड झाला.त्यामुळे वैमानिकांनी तातडीने निर्णय घेत, हे विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्लीहून गोव्याकडे निघालेल्या इंडिगो फ्लाईट 6E 231 या प्रवाशी विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने निर्णय घेतला आणि विमानचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे आपत्कालीन लॅंडिंग केले.

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून,त्यांना सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक विमानातून बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेमुळे विमान प्रवासात संभाव्य धोके आणि तत्काळ प्रतिसादाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. एयरलाइनकडून या बिघाडाच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली असून, तांत्रिक पथकाने तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT