Video

Operation Sindoor: पाकिस्तानवर एअर स्ट्राईक कसा केला? इंडियन आर्मी सांगणार, 10 वाजता पत्रकार परिषद

Operation Sindoor Air Strike: भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने मिळून संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. बुधवारी लष्कर या ऑपरेशनबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.

Dhanshri Shintre

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने जोरदार बदला घेतला आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने मिळून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर मध्यरात्री कारवाई केली. ही संयुक्त मोहीम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. आता भारतीय लष्कर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचे अधिकृत तपशील जाहीर करणार आहे.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी भारतीय लष्कर ०७ मे, बुधवारी म्हणजेच आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ऑपरेशनशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाहीर करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषद नवी दिल्लीतील मीडिया सेंटर, पीआयबी येथे आयोजित करण्यात आली आहे. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून देशभराचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ७ मेच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर जोरदार स्ट्राइक केला. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांत ही कारवाई पार पडली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि दहशतवाद्यांना ठोस संदेश दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT