India Post temporarily suspends all shipments to the United States due to new US customs duty rules. Saam Tv
Video

टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्पना भारताचा तडाखा! 'पार्सल' बंद|VIDEO

US Customs Duty Changes: भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या डाक विभागाने अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व टपाल सेवांना २५ ऑगस्टपासून तात्पुरता स्थगिती दिली आहे.

Omkar Sonawane

संचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील डाक विभागाने अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व टपाल वस्तू २५ ऑगस्टपासून तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकन सरकारच्या कार्यकारी आदेशामुळे घेण्यात आला असून, त्यानुसार २९ ऑगस्टपासून ८०० डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील करमुक्त सवलत मागे घेतली जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेकडे पाठविल्या जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर आता देशनिहाय सीमाशुल्क आकारले जाणार आहे. तथापि, १०० डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तूंना करमुक्ती कायम राहणार आहे.

डाक विभागाने स्पष्ट केले आहे की, ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित घटकांच्या समन्वयाने सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ज्यांनी आधीच अशा वस्तू बुक केल्या असून त्या अमेरिकेकडे पाठवता येणार नाहीत, त्यांना पोस्टेजचा परतावा मिळणार आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT