Video

India Vs Pakistan War: पाकिस्तानची फजिती! आतापर्यंत पाकचे १०० ड्रोन भारताने पाडले

Pakistan Drones: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलली आहेत. भारतीय कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची झोप उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने पाकिस्तानची घबराट उडाली आहे. ८ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय प्रतिसादाने त्यांची योजना फसली. भारताने शौर्य दाखवत ५० पेक्षा अधिक ड्रोन निष्प्रभ केले आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला करारा प्रतिउत्तर दिले.

पाकिस्तानकडून वाढत्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. भारतीय लष्कराने L-70 आणि ZU 23mm यंत्रांचा वापर करून कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनचा सफाया केला आहे. एका मिनिटात 4000 पेक्षा जास्त फेऱ्या झाडणाऱ्या १४ शिल्का तोफा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, S-400 प्रणालीनेही अनेक क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या अडवले आहेत.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये एका पाकिस्तानी ड्रोनमुळे निवासी भागात हल्ला झाला आहे. यामध्ये एक कुटुंब जखमी सुद्धा झालेलं आहे. या कुटुंबातील रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पंजाबमधील होशियारपूर येथे सैन्याच्या तळाजवळ स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतंच जम्मू-काश्मीरमध्ये अनेक भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आतापर्यंत भारताने पाकिस्तानाचे १०० पेक्षा अधिक ड्रोन पाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT