India destroy 600 pakistani drone saam tv
Video

India vs Pakistan : भारताचा जोरदार दणका, पाकिस्तानचे ६०० ड्रोन पाडले

Operation Sindoor Latest News : भारतानं पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानचे ६०० ड्रोन भारताने पाडले आहेत. यावरून अख्ख्या जगाला भारताच्या ताकदीचा अंदाज आला आहे.

Nandkumar Joshi

दहशतवाद्यांचा पुळका असलेला आणि मस्तवाल झालेला पाकिस्तान आता कधीच डोळे वर करून बघणार नाही असा दणका भारतानं दिला आहे. भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळं बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतीय सैन्याच्या ठिकाणांवरच हल्ले करण्याचा प्रयत्न केला. आकाशातून ड्रोन हल्ले केले. पण भारतीय लष्कराच्या डिफेन्स सिस्टिमने ते आकाशातच नष्ट केले. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, भारतीय एअर डिफेन्स सिस्टिम आणि लष्करानं केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानचे तब्बल ६०० ड्रोन हवेतच नष्ट केले.

यावरून भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला चांगलाच अनुभव आलाय. पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतवून लावला. भारताच्या लष्करी ठिकाणांवर आणि नागरी क्षेत्रांवर ड्रोनद्वारे हल्ल्यांचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर देत हल्ले परतवून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT