turkey movie saam tv
Video

Boycotts Turki: भारताचा तुर्कीला दणका; तुर्की चित्रपट, वेबसीरिजना भारतात बंदी|VIDEO

OTT Platforms: भारत पाकिस्तान तणावा दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. आता भारताने तुर्कीला हद्दपार करण्यास सुरुवात केले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले, भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. तसेच या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी यमसदनी पाठवले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला होता. पाकिस्तानकडून देखील भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतीय सैन्याने हे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. या हल्ल्यासाठी पाकिस्तानने जे ड्रोन वापरले होते ते तुर्कीचे होते. भारत पाकिस्तान वादात तुर्कीन पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याचे समोर आले होते.

दरम्यान पाकिस्ताननंतर आता भारताने तुर्कीच्या आर्थिक नाड्याअवळण्यास सुरुवात केली आहे. भारताने बायकॉट तुर्की अभियानाला सुरुवात करत अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकला आहे.

दुसरीकडे तुर्कीला आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे भारतीय व्यापाऱ्यांसोबतच आता इंडियन फिल्म इंडस्ट्रीकडून देखील मोठा दणका देण्यात आला आहे. आता FWICE ने नेटफ्लीक्स, प्राइम, जीओ हॉटस्टारला पत्र पत्र देऊन तुर्की सिनेमा आणि वेब सिरिज काढून टाकायला सांगितले आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणे तुर्कीला चांगलेच भोवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT