Rahul Gandhi News SaamTv
Video

Rahul Gandhi News : राहुल गांधींची चिखलीतील सभा रद्द; काय आहे कारण पाहा Video

Rahul Gandhi Chikhali Campaign Rally Canceled : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात प्रचाराला वेग आला आहे. विविध नेत्यांच्या सभा होत आहेत. राहुल गांधी हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांची बुलढाण्याच्या चिखलीत सभा होणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे.

Saam Tv

राहुल गांधी यांच्या विमानात बिघाड झाल्याने चिखली येथील त्यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या जागी आता रमेश चेन्नथला व सचिन पायलट हे चिखलीची सभा घेणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे राहुल गांधी यांचं विमान आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरू शकलं नाही. त्यानंतर हे विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना झालं. त्यामुळे मंगळवारी बुलढाण्याच्या चिखलीत होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करावी लागली आहे. त्यांची सभा आता थेट गोंदियामध्ये होणार आहे. दरम्यान, यानंतर राहुल गांधी यांनी या बाबत एक व्हिडिओ बनवून सभा रद्द झाल्याने माफी मागितली आहे. 'तांत्रिक अडचण आल्याने मला चिखलीत पोहोचता आलं नाही. त्यामुळे इथली माझी सभा आणि रॅली रद्द करावी लागली. त्यासाठी मी माफी मागतो. आज चिखलीत मी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार होतो. राज्यातील सोयनीब आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या मालाला योग्य भाव सरकार देत नाही आहे. मविआचं सरकार आलं तर आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू', असा दावा त्यांनी आपल्या व्हिडिओ मधून केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT