Hingoli ZP School News Saam TV
Video

Hingoli News : दारुड्या गुरुजींचा शाळेत राडा, व्हिडिओ झाला व्हायरल

Hingoli ZP School News : जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन शाळेत गोंधळ घातला आहे. या घटनेवर ग्रामस्थानी संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे.

Saam Tv

हिंगोलीच्या मारसेलू गावात चक्क जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन शाळेत गोंधळ घातला आहे. गजानन वळकुते असं या मद्यपी शिक्षकाचं नाव आहे.

आपल्याला विद्या देणारे शिक्षक हे देवासमान समजण्याची शिकवण आपल्याला दिली जाते. ज्या शाळेच्या पवित्र जागी मुलांचे भविष्य घडणार असते तिथेच स्वत: शिक्षकाने मद्य पिऊन गोंधळ घालणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. व्यसनांपासून दूर राहावे अशी शिकवण देणारे गुरुजीच दारू पिऊन तर्राट असलेले बघायला मिळाले आहे. हिंगोलीच्या मारसेलू येथील जिल्हापरिषद शाळा सुरू असतानाच हा शिक्षक दारूच्या नशेत झिंगत शाळेत दाखल झाला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, ही घटना समजताच ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून या प्रकारची माहिती दिली. तसेच या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वत: शिक्षकच असे वागत असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय असा सवाल यावेळी पालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT