LPG Gas Cylinder Saam TV
Video

नको तेच झालं! युद्धाच्या झळा भारताच्या दारात, पुण्यात सिलिंडरच्या नव्या ऑर्डर घेणं थांबवलं

Iran Israel war impact on LPG supply in India : इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. पुण्यातील शिक्रापूर आणि चाकण येथील प्लांटमधून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला.

Namdeo Kumbhar

Iran Israel war impact on LPG supply in India : युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचू लागल्यात. इराण आणि इस्त्रायल - अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत रहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील बीपीसीएल शिक्रापूर इथल्या प्लांटमधे आणि चाकण मधील एचपीसीएल प्लांटमधे व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद करण्यात आलय. डीलर्सनी व्यवसायिक वापराच्या सिलेंडर्ससाठी गाड्या पाठवू नयेत अशा सुचना त्यांना देण्यात आल्यात. व्यवसायिक वापराचा सिलेंडर ५ , १९ , ३५ , ४७ आणि ४२७ किलो अशा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हॉटेल्स आणि इतर व्यवसायिक कारणांसाठी त्याचा वापर केला जातो. Commercial LPG cylinder supply stopped in Pune

व्यवसायिक वापराचा सिलेंडर कुठे वापरला जातो

व्यवसायिक वापराचा सिलेंडर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधे वापरला जातो. इंडस्ट्रीयल वापरासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो. धातु वितळवणे, पावडर कोटींग करणे अशा वेगवेगळ्या कामांसाठी हा गॅस वापरला जातो. त्याचबरोबर पाच आणि सात किलोच्या प्रमाणात देखील तो लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. व्यवसायिक वापराच्या सिलेंडरव सरकारकडून अनुदान दिले जात नाही त्यामुळे घरगुती सिलिंडरपेक्षा त्याची किंमत जास्त असते. घरघुती वापराच्या गॅस सिलेंडर वर सध्या कोणताही परिणाम झालेला नाही. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर नागरिकांना व्यवस्थित मिळावा यासाठी खबरदारी म्हणून व्यवसायिक वापराच्या सिलेंडर वर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT