Liquor News SaamTv
Video

Liquor News : मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी! खरेदीसाठी लागणार ओळखपत्र | VIDEO

Delhi Government Latest Decision : मद्यप्रेमींना आता यापुढे मद्य खरेदीसाठी ओळखपत्र सोबत बाळगावं लागणार आहे. त्याशिवाय मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Saam Tv

मद्य प्रेमींसाठी मोठी माहिती आता समोर आली आहे. मद्य खरेदी करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. याबद्दलचे आदेश सरकारने जारी केले आहेत. २५ वर्षांच्या खालील तरूणांना आता मद्य विकणं देखील बेकायदेशीर ठरणार आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब आणि रेस्टॉरंटला २५ वर्षांखालील तरूणांना मद्य विक्री न करण्याचा नियम बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्या आहे. इतकंच नाही तर ग्राहकांच्या ओळखपत्राची प्रत पाहूनच वयाची पडताळणी करत मद्य विक्री करण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता २५ वर्षांखालील व्यक्तींना मद्य विक्री करणं बेकायदेशीर ठरणार आहे. मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब आणि रेस्टॉरंटला हा नियम बंधनकारक असणार आहे. ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. अल्पवयीन तरूणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करून अल्पवयीन तरूणांना दारू विक्री केल्यास मद्य विक्रेत्याचा परवाना रद्द होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT