Husband Wife Quarrel Saam tv
Video

Husband Wife Quarrel : बायकोच्या साबणाने अंघोळ करणे भोवलं; तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, VIDEO

Husband wife Dispute : नवऱ्याने बायकोच्या साबणाने अंघोळ केल्याने वादाला तोंड फुटलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. या प्रकरणात बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Vishal Gangurde

फक्त बायकोच्या साबणाने अंघोळ केल्याने बायकोने थेट पतीची पोलिसांत तक्रार केल्याची घटना घडली आहे. बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नवऱ्याला अटक केली. पतीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचाही त्याने आरोप केलाय. प्रवीण असे नवऱ्याचे नाव आहे. प्रवीणचं लग्न 13 वर्षापूर्वी झालं.

आरोपी प्रवीणी हा बायको आणि आई हिच्यासोबत एकत्र राहतो. प्रवीण सकाळच्या सुमारास आंघोळ करत होता. त्यावरून पत्नीने वाद घालायला सुरुवात केली. माझ्या साबणाने तू का आंघोळ करत आहेस? असा सवाल तिने नवऱ्याला केला. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. त्यानंतर या वादात पत्नीने नवऱ्याला वीट फेकून मारली. हा वाद इतका टोकाला गेला की पत्नीने थेट पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. उत्तर प्रदेशातील अलिगडच्या रावण टीला भागात ही घटना घडलीय. मात्र, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक

Vijaykumar Gavit: डॉ. विजयकुमार गावित सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री; शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप|VIDEO

Salman Khan Shera : सलमान खानच्या बॉडीगार्डवर दु:खाचा डोंगर, शेराच्या वडिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सरकारची 'ही' जबरदस्त योजना, खात्यात जमा होणार ३६००० रुपये

SCROLL FOR NEXT