A famous Kathiyawadi hotel in Charoti replaced its Gujarati signboard with a new Marathi one, earning praise from locals. Saam Tv
Video

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

Ahmedabad Highway: अहमदाबाद महामार्गावरील चारोटी परिसरातील काही हॉटेल्सनी गुजराती पाट्या हटवून मराठी पाट्या लावल्या आहेत.

Omkar Sonawane

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांवर अखेर कारवाई झाली आहे. डहाणूजवळील चारोटी परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलवरील गुजराती पाट्या हटवून त्याऐवजी मराठी पाट्यांचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे, या भागातील एका प्रसिद्ध काठीयावाडी हॉटेलने दिवसभरातच आपली जुनी गुजराती पाटी उतरवून नवीन मराठी पाटी लावली. हे बदल पाहून स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, अजूनही काही हॉटेल्समध्ये गुजराती मजकूर झळकत असून, स्थानिक नागरिक आणि संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी भाषा दिन आणि स्थानिक संस्कृतीचा सन्मान लक्षात घेता या भागातील हॉटेल्सनी मराठी भाषेचा आदर राखावा, अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाकडूनदेखील याबाबत लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT