Ahmednagar Accident Video Saam TV
Video

Accident Video : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भयानक अपघात, ४ वाहने एकमेकांवर आदळली, घटनेचा थरार पाहा

Ahmednagar-Sambajinagar highway accident : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ४ वाहने एकमेकांवर आदळली.

Satish Daud

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ४ वाहने एकमेकांवर आदळली. यातील दोन ट्रक थेट दुकानात घुसले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचावकार्य सुरु असून ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल येथे आज शनिवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने पुण्याहून संभाजीनगरच्या दिशेने जात होती.

यातील एका वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच वाहनाने समोरून जात असलेल्या इतर वाहनांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की चारही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील दोन ट्रक थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या दुकानात शिरले.

सुदैवाने दुकानात कुणीही नसल्याने मोठी जीविहातहानी टळली. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT