महाराष्ट्रात होळी Saam Tv
Video

Holi Festival: राज्यात होळीचा उत्साह शिगेला, VIDEO

Traditional Holi: संपूर्ण राज्यात होळीचा सण अत्यंत उत्साहाने पार पडत आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.

Omkar Sonawane

"होळी रे होळी, पुरणाची पोळी!" असे म्हणत आनंदाने साजरा केला जाणारा हा सण रंग, उत्साह आणि एकोपा वाढवणारा असतो.

रायगड जिल्ह्यातही होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळीवाड्यात मोठ्या थाटामाटात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या सणाचा आनंद लुटला. रात्री कोळीवाड्यात ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आल्या. स्त्रियांनी होळीचे मनोभावे पूजन करून नैवेद्य अर्पण केला.

यानंतर, सर्वांनीच डीजेच्या तालावर ठेका धरला. गुलाल आणि रंगांच्या सान्निध्यात, हास्य-विनोद आणि नृत्याच्या लयीत कोळीवाडा जल्लोषमय झाला. एकोप्याचा, आनंदाचा आणि रंगोत्सवाचा हा सोहळा कोळी बांधवांसाठी वर्षानुवर्षे परंपरेचा भाग राहिला आहे.

होळीच्या या रंगतदार सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे, प्रेमाचे, मैत्रीचे आणि बंधुत्वाचे रंग अधिक गडद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT