Mumbai-Goa Highway Traffic  Saam Tv
Video

Holi 2025 : शिमग्यासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल, मुंबई-गोवा हायवेवर वाहनांच्या रांगा, पाहा VIDEO

Mumbai-Goa Highway Traffic : होळी, शिमगोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा हायवेवर ७ ते ८ किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Yash Shirke

Holi News : होळी, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई - गोवा हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. गावी जाऊन होळी साजरी करणारे चाकरमानी ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत.

होळी त्यातही शिमगा हा प्रत्येक कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये वास्तव्याला राहणारा प्रत्येक चाकरमानी होळीसाठी गावी जात असतो. यंदाही अनेकजण गावाला शिमगोत्सवासाठी जात आहेत. एकाच वेळेला बरेचसे लोक कोकणात जायला निघाल्याने मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनांच्या तब्बल ७ ते ८ किमी लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यांचे काम सुरु असल्याने, रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवल्याचे म्हटले जात आहे. मानगाव, इंदापूर येथे ट्रॅफिक जाम झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT