HMPV Virus News SaamTv
Video

HMPV Virus Maharashtra : HMPV चा महाराष्ट्रात शिरकाव? नागपूरच्या दोन रुग्णांच्या रिपोर्टची अपडेट काय, पाहा Video

HMPV Nagpur Suspected Cases : नागपूरमध्ये HMPV चे दोन संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यानंतर आता चिंता वाढली असून या संशयित चिमुकल्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात HMPV विषाणूचा अखेर शिरकाव झाला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागपूरमध्ये HMPV चे दोन संशयित रुग्ण आढळलेले आहेत. ७ आणि १३ वर्षांच्या चिमुकल्यांना HMPV ची लागण झाली असल्याची शंका आहे. खासगी लॅबमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र या संदर्भात स्पष्ट असा निर्णय समोर आलेला नाही. हे संशयित रुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता HMPV महाराष्ट्रात शिरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण हे संशयित रुग्ण असले तरी यामुळे चिंता वाढली आहे. काल महाराष्ट्राच्या वेशीवर अनेक रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने सतर्कता म्हणून मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. त्यानंतर आता आज थेट राज्यातच नागपूरमध्ये संशयित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. खासगी लॅबमधून आलेले हे रिपोर्ट आता शासकीय यंत्रणेकडून तपासले जाणार आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुम्हाला जिवंत सोडणार नाही...; बीडमधल्या कुंबेफळमध्ये खळबळजनक घटना

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

फक्त २ मिनिटांचा चमत्कार! 'ओम' च्या उच्चाराने शरीरात होतील 5 मोठे बदल

LPG Connection Update : ...तर ८ दिवसांत तुमचं LPG गॅस कनेक्शन होणार बंद; Indane, HP आणि Bharat गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

SCROLL FOR NEXT