HMPV News SaamTv
Video

HMPV Virus News : चीनमध्ये HMPV चा उद्रेक; राज्याचे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, जारी केल्या सूचना | Video

HMPV Virus Outbreak In China : महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या आणि चीनमध्ये थैमान घालणाऱ्या HMPV विषाणूच्या उद्रेकाला रोखण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Saam Tv

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आलं आहे. राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. कोरोना सारखा हा विषाणू उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांनासुद्धा या संदर्भातलं पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र नागरिकांनी श्वासनाच्या संसर्गापासून बचाव करावा यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहे.

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एचएमपीव्ही विषाणूमुळे आता राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करून काळजी घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. कारण या आजाराचा देखील संसर्ग डोळे, नाक, तोंडानेच होतो. त्यासाठी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणं टाळा. कुणाशी हस्तांदोलन देखील करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ताप, शिंका आणि खोकला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Good News : मुंबई-पुण्यात १० नवी मेट्रो सुरू होणार, नावे आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Google Pay, PhonePe, Paytm युजर्सला धक्का! आता UPI पेमेंटवर द्यावा लागणार चार्ज? संसदेत बिल सादर

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

SCROLL FOR NEXT