HKU5-CoV-2 Virus News  saam tv
Video

HKU5-CoV-2 : कोरोनापेक्षा महाभयंकर संकट जगाच्या उंबरठ्यावर? | VIDEO

HKU5-CoV-2 Virus News : कोरोनाचा धोका देशात वाढत असतानाच, आणखी एक महाभयंकर संकट जगावर घोंघावतंय. HKU5-CoV-2 हा व्हायरस आढळून आला आहे. हा विषाणूचा संसर्ग भविष्यात माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी भीती आहे.

Nandkumar Joshi

कोरोनापेक्षा महाभयंकर संकट जगाच्या उंबरठ्यावर आहे. आणखी एक घातक व्हायरस आढळून आला आहे. ‘HKU5-CoV-2’ असं या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसमुळे कोविडपेक्षा जास्त मृत्यूचं तांडव घडू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या, हा विषाणू वटवाघळांमध्ये आढळून आला आहे. हा विषाणूचा धोका भविष्यात माणसांना अधिक प्रमाणात होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कोविड १९ चा आणखी एक नवा व्हेरियंट चीनमध्ये आढळून आला आहे. त्यामुळं आणखी एका महाभयंकर महामारीचं संकट जगावर कोसळू शकतं, अशी चिंता अमेरिकी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये वटवाघळांमध्ये हा HKU5-CoV-2 हा व्हायरस आढळून आला आहे. हा विषाणू एमईआरएस कोरोना व्हायरसचाच एक भाग आहे. मात्र, तो मानवजातीसाठी किती धोकादायक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये संक्रमित झाला आहे की नाही याबाबत अद्याप संशोधन करायचा आहे, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

साखर की पिठीसाखर? आरोग्यासाठी काय सर्वाधिक फायदेशीर, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

SCROLL FOR NEXT