Raj-Uddhav Thackeray saam tv
Video

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

Thackeray Brothers Alliance Announcement Today: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये होणार आहे.

Namdeo Kumbhar

Thackeray Brothers Alliance News : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलाय. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी? याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा जरी झाली असली तरी त्याची घोषणा कधी केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. (Shiv Sena MNS alliance for municipal elections)

मनसे अन् शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता उर्वरित महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

युतीच्या घोषणेआधी बाळासाहेबांना आभिवादन

आज ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत. त्याआधी दोन्ही बंधू शिवाजी पार्कात जाणार आहेत. शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळास अभिवादन करणार आहेत. त्यानंतरच दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT