SHOCKING KNIFE ATTACK IN HINGOLI MARKET TWO ARRESTED Saam Tv
Video

हिंगोलीत भर बाजारपेठेत तरुणावर चाकू हल्ला, पाहा थरारक VIDEO

Hingoli Police Arrest Two Suspects: हिंगोलीच्या बाजारपेठेत शनिवारी दुपारी तरुणावर अचानक चाकू हल्ला झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.

Omkar Sonawane

हिंगोली : शहराच्या बाजारपेठेत शनिवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणावर चाकू हल्ला झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांसमोर घटना उघडकीस आली आहे. हल्ला करणाऱ्यांनी कृष्णा जगताप या तरुणावर अचानक हल्ला केला. त्यात कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंगोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हल्ल्याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT