Hingoli Saam Tv
Video

Hingoli : हिंगोलीत पावसाचा कहर! चार दिवसांपासून १० गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Maharashtra Rain Update : हिंगोलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दहा गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु असून औंढा तालुक्यातील, गोळेगाव, अंजनवाडी, बेरोळा, कोंडशी एकबूर्जवाडी या गावांचा थेट संपर्क तुटला आहे. तर गोजेगाव परिसरातील तलाव तुडूंब भरुन वाहू लागला असून पाणि पुलावरुन वाहत असल्यामुळे निम्म्या गावाचा संपर्क मागील ७२ तासांपासून तुटलेला आहे. या परिस्थितीत अनेकांची जनावरे गावाच्या पलीकडेच मुक्कामी ठेवावी लागत आहेत. मुसळधार पावसामुळे गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अशक्य बनले आहे. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातील ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT